नरडाणा गावाजवळील कलमाडी गावात मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण. योगिता गजानन मोरे राहणार कलमाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातीलच काही जणांनी, मागील भांडणाची कुरापत काढत आम्हाला लाकडी काट्याने व तसेच दाता बुक्क्यांनी मारहाण करीत वाईट वाईट शिवीगाळ केली व तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी देखील धमकी दिली. यावरून चार जणांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.