फिर्यादी ओम बिजुरकर यांच्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट ला एक वाजताच्या सुमारास फिर्यादीचे वडील अनिल बिजुरकर हे एम एच 29 बीएम 9949 चा क्रमांकाने दुचाकी ने जात असताना त्यांनी आपले वाहन भरगाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच सावंगी मेघे येथे त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी 11 सप्टेंबरला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून घटनेची नोंद करण्यात आली.