चिखलदरा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलगी दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी शेतावर गेल्यानंतर बेपत्ता झाली असून या प्रकरणी काल २१ सप्टेंबर रोजी १ वाजता चिखलदरा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी दुपारी १२ वाजता शेतात गेली होती.सायंकाळी साडेसात वाजता शेतातून परत येत असताना गावातील अलका सावजी कास्देकर यांनी तिला आपल्या घरी बोलावून नेले,मात्र त्यानंतर ती पुन्हा घरी परतली नाही,तिचा आजुबाजुला,मैत्रींनीकडे, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला.