प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत वाई नगरपालिका हद्दीतील कृष्णा नदी तीरावर दोन्ही बाजूस नव्याने सात घाट बांधण्यात येणार असून हेरिटेज वॉकची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करून दिली असून वाई नगरपालिकेकडे हा निधी वर्ग झाला आहे.