डोंबिवली मध्ये मागील काही दिवसापूर्वी एकाच व कुटुंबातील चार वर्षाची चिमूरडी आणि तिच्या चोवीस वर्षीय मावशीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.सर्पदंश झाल्यानंतर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र येथे तज्ञ डॉक्टर हजर नव्हत त्यामुळे दोघींचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला. या डॉक्टर आणि रुग्णालयावर कक कारवाई करावी आणि आमच्या मुलींना न्याय मिळवून द्यावा,यासाठी डोंबिवलीकर नागरिकांसह चिमुकलीची आई रस्त्यावर उतरली आणि आक्रोश करत न्यायाची मागणी केली.