माजलगावशहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी माजलगाव शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव, आगामी इतर सण उत्सव तसेच राजकीय आंदोलने या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. शहरातील मुख्य मार्ग, व्यापारी पेठा, संवेदनशील परिसरातून पोलिसांचे पथसंचलन झाले. अचानक झालेल्या या पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.