यवतमाळ येथील चिंतामणी मार्केट यार्ड येथे संत श्री मोरारीबापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभेचे आमदार अशोक उईके यांनी आज दि 6 सप्टेंबर रोजी भेट देऊन रामकथेचे दर्शन घेतले तसेच भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.