अलिबाग तालुक्यातील वाडगाव गावात गणेशोत्सवाची अनोखी पूर्वपरंपरागत परंपरा आजही जपली जाते ,सात दिवसांच्या आनंद सोहळ्यानंतर सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने आणि एकात्मतेने आपल्या बाप्पाचे विसर्जन करतात ,गावातील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन एकत्रित रित्या केले जाते, प्रथम गावदेवीच्या पारावर सर्वजण एकत्र जमा होऊन सार्वजनिक आरती सादर केली जाते त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात 'गणपती बाप्पा मोरया ' च्या जयघोषात भाविक एकदिलाने सहभागी होतात.