लातूर -जल प्रदूषण टाळण्यासाठी मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणेश मूर्ती संकलन उपक्रमा अंतर्गत शहरातून जवळपास १७६६३ गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या.या सोबतच यंदा निर्माल्य संकलनासाठी पालिकेने ठेवलेल्या कलशामध्ये गणेशभक्तांनी ४३२० किलो निर्माल्याचे दान केले.या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.