आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, चार सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता फिर्यादी आशिष देवलाल गवांडे वय 31 वर्ष राहणार राजमाता जिजाऊ चौक सिडको महानगर छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 3 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आज्ञा चोट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाथरकर पुढील तपास करीत आहे.