उरणमधील महत्वाच्या आणि संवेदनशील ओएनजीसी प्रकल्पात मोठी आग लागण्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून, आग विझवण्यासाठी सीआयएसएफ आणि सिडको अग्निशमन डाळ प्रयत्न करत आहेत. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये घाबरातीचे वातावरण पसरले आहे. उरणमधील सर्वात मोठे ONGC हे नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकारण केंद्र असून, याकेंद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल वितरण करण्यात येते. भारत सरकारकडून हा प्रकल्प संचालित आहे.