परळी तालुक्यात महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दौरा केला. या पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले. महापुरामुळे शेतकऱ्यांची शेती, जनावरे तसेच घरगुती संसारसामान यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून आले.खासदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी सांगितले की, सरकारकडे तातडीने अहवाल सादर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.