अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली अकोला जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी संघटनांनी जिल्ह्याला ‘ओला दुष्काळ’ म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद ही प्रमुख पिके ध्वस्त झाली असून, उत्पादन शून्यावर आले आहे. शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून शेती केली होती.