लातूर -लातूर जवळील गंगापुर येथील पूल मुसळधार पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी माहिती गंगापूर येथील माजी सरपंच तथा भाजपचे नेते बाबुराव खंदाडे यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दिले आहे.