बियाणी चौकात शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एक व्यक्ती महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे गटारीत पडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर गेल्या तीन दिवसापासून आपत्ती व्यवस्थापन व शोध बचाव पथकाच्या कडून युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू आहे मात्र त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा गेल्या तीन दिवसापासून लागला नाही आजही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कडून शोध कार्य घेण्यात आले मात्र त्याचा मृतदेह अजून पर्यंत सापडला नसल्याची माहिती सेवानिवृत्त तलाठी सुनील कल्ले यांनी दिली.