मुंडगाव येथिल संत गजानन महाराज यांच्या मूळ पादुका असणाऱ्या मंदीरात, शांतीवन अमृततिर्थ सजल विहीर व गजानन नगर येथील गजानन महाराज मंदिर येथे ऋषिपंचमी उत्सव गुरुवारी मोठ्या भक्तीभावात साजरा झाला सुमारे 115 वर्षानंतर तारीखतिथी एकाच दिवशी आल्याने भक्तांमध्ये यावेळी मोठा उत्साह होता तर गणगण गणात बोतेच्या गजरात सकाळपासूनच भाविकांनी विविध ठिकाणच्या गजानन महाराज मंदिरांमध्ये श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तर श्रींच्या विविध मंदीरांमध्ये यावेळी भाविकांना महाप्रसाद वितरीत झाला.