धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथील सर्व गणेश मंडळांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे.जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणला बसल्यामुळे कसबे तडवळ्यातील सर्व गणेश मंडळांनी दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातुन रॅली काढून गणेश मंडळांनी मिरवणूक व डीजे तसेच खर्च न करता जरांगे पाटील यांना मुंबईला रसद पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे.