देगांव येथील एका आरोपीने दोन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची संताप जनक घटना शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आल्याने रविवार दि.३ ऑगस्ट रोजी बाळापूर पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.आरोपी हा स्कूल बसचालक असल्याचे सांगण्यात येत असून तो परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करत होता व त्याने हे कृत्य केल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र अशा घटनांमुळे पालकांनी सुद्धा मुलांना शाळेत पाठवितांना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे