ठाणे जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या शासकीय निवासस्थानातील छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ठाण्यातील बारा बंगलो परिसरातील चैतन्य मरतीत राहणाऱ्या ठाणे जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी ही दुर्घटना घडली आहे. पहिल्या मजल्यावरील बेडरूम मधील शेताचा स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली परंतु सुदैवाने हा छताचा असल्यास बेडरूमच्या बाजूला कोसळल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.