आज २६ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्त आयोजित 'श्री चक्रधरस्वामी व लीळाचरित्र' या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द कवयित्री व समीक्षक डॉ. प्रभाताई गणोरकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अशोकराव राऊत, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर उपस्थित होते..