महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु श्री बाळूमामा देवालय, आदमापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देवालय न्यासाच्यावतीने मंदिर, भक्त निवास, अन्नछत्र व संपूर्ण परिसराची स्वच्छता, देखभाल व व्यवस्थापनाची कामे दिनांक १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हाती घेण्यात येणार आहेत.त्यामुळे याकाळात मंदिर व अन्नछत्र बंद ठेवण्यात येणार आहे.