आज १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडे बारा वाजता मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना माकड (वानर) या प्राण्यापासून होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले व माकड (वानर) पकडण्यासंदर्भात मागणी केली असता माननीय मंत्री महोदयांनी या बैठकीमध्ये या संदर्भातील जीआर काढून शेतकऱ्यांना व नागरिकांना सहकार