वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे, बॅटऱ्या आणि एक दुचाकी असा ऐकून १ लाख ४६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.