लातूर – शहरातील गंजगोलाईजवळील जुन्या आणि प्रसिद्ध अशा चापसी सन्स अँड मेडिकल स्टोअरला आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात औषधांच्या पट्ट्या, गोळ्या, तसेच सर्जिकल साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे लाखोंचे नुकसान झाले आहे.