आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान मारताळा येथे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, हेक्टरी तात्काळ पन्नास हजार रुपये मदत द्यावी त्या प्रमुख मागण्यांसाठी नांदेडमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले.. नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.. लोहा तालुक्यातील मारतळा येथे रास्ता रोको करण्यात आला. पंजाब सरकारने ज्याप्रमाणे हेकरी 50 हजार मदत केली, तशी तात्काळ मदत करावी नंतरच नेत्यांनी दौरे करावे असा इशारा सरकारला शेतकऱ्यांनी दिला.