मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर सरकारने पाचव्या दिवशी यावर तोडगा काढला आणि मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सरकारने मान्य केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. सरकारने दिलेल्या या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे. कल्याण परिसरामध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीने गुलाल उधळून पेढे भरून जल्लोष करण्यात आला.