मोताळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी धाड टाकली असता एका इसमाकडून ३ लाख २३ हजार रुपयांचा जवळपास १६ किलो गांजा पकडून रोहिदास पांडूरंग मोहिते यास ताब्यात घेतले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास पांडूरंग मोहिते विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.