भंडारा शहरातील सनी प्लाझा हॉटेलच्या समोर पोलीस स्टेशन भंडारा येथील पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना एक आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी चिलम मध्ये अमली पदार्थ गांजा भरून सेवन करताना मिळून आला. ही घटना दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.20 वाजता दरम्यान घडली. आरोपीच्या ताब्यातून एक मातीची चिलम, एक सुती कापडाचा तुकडा व माचिस डब्बी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम 27 एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास...