मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी तीव्र होत चालली असून या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देण्यासाठी आज बीड तालुक्यातील मांजरसुंबा गावात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मराठा समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आंदोलनाला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रशासन सतर्क झाले