कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून खासदार क्रीडा संग्रह हा महोत्सव राबवला जात असून यंदा आज त्याचा शुभारंभ माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा क्रीडा उपक्रम पार पडणार आहे त्यामुळे सहभागी होण्याचे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. या उपक्रमाला हरभजन सिंग यांनी उपस्थिती लावून मी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात खेळणार असल्याचेही सांगितले.