उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील तानाजी नगर येथे एमआयडीसी रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. विटांनी भरलेला ट्रक जात असताना त्याचा ब्रेक अचानक फेल झाल्याने तो भर दो वेगाने धावू लागला आणि तो एका घरावर जाऊन धडकला. सुदैवाने ट्रक धडकला त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे,अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.