शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी येथील भास्कर ताजणे यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भद्रावती-वरोरा, चिमुर तथा ब्रम्हपुरी या विधानसभा क्षेत्राचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. भास्कर ताजणे यांनी यापुर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भुषविले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.