गांधीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत रविवारी रात्री उशिरा जुन्या वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात 65 वर्षीय विठ्ठल कृष्णा पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.गळा,मान आणि पोटावर गंभीर वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या हल्ल्यात ऋषिकेश सुनील पाटोळे आणि अलका ज्ञानू पवार हे देखील जखमी झाले आहेत.ही घटना रविवार, 24 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.या प्रकरणाची नोंद आज गांधीनगर पोलिसात झाली आहे.