वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही त्यावर महानगरपालिकेने ठोस निर्णय, उपाययोजना न राबवल्यामुळे आ. बापुसाहेब पठारे यांनी नागरिकांच्या समवेत महापालिकेवर मोर्चा नेला. मोर्चानंतर पाणीपुरवठा विभागाने वडगावशेरी मतदारसंघामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार २.५० ते ३ तास पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे.