लातूर -लातूर तालुक्यात दिवाळीच्या आनंदाला चारचाँद लावणारा उपक्रम आज राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव ज्योतीराम चिवडे पाटील यांच्या पुढाकारामुळे श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आणि अपंग योजना या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच थेट आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.चिवडे पाटील यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेल्या पत्रास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बँकेच्या गाडीने गावामध्ये येऊन वृद्ध, अपंग आणि निराधार लाभार्थ्यांना रोख मदत देण्यात आली.