विद्युत तारांचा शॉक लागुन शेतकर्याचे दोन बैल दगावल्याची घटना रविवार २४ ऑगस्ट रोजी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात घडली. या घटनेत शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेत शिवारात लोंबकळलेल्या विद्युत तारांमुळे शेतामध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागुन दोन बैल दगावल्याची घटना रविवार २४ ऑगस्ट रोजी घडली. सदर प्रकरणात पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेत शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.