नांदुर नाका येथे निमसे व धोत्रे या दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत राहुल धोत्रे याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन जेलरोड अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत एस आय टी कडून केला जाणार आहे. त्याबाबतचे आदेशही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काढले आहेत.