नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगाव शिवारात दि २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी दहा ते दि ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सहाच्या दरम्यान यातील मयत माधवराव सदाशिव गंगणे वय ६२ वर्षे यांनी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या ताणतणावाखाली राहून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खबर देणार व्यंकटी गंगणे यांनी दिलेल्या खबरीवरून आज सायंकाळी माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुडपे आज करी