नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असले तरी तेथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नगर विकास सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खासदार नरेश मस्के यांनी दिले. या बैठकीला नगर विकास खात्याचे मुख्य सचिव,नवी मुंबई मनपा आयुक्त,सिडको संचालक उपस्थित होते.