मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या आंदोलनला यश आले असून सरकारने त्याबाबतचा जीआर काढलाय, माञ दुसरीकडे आज बुधवारी राहुरी येथील सकल ओबीसी समाज बांधवांनी एकञित येत राहुरी तहसील कार्यालयासमोर शासनाने काढलेल्या जीआरच्या प्रतींची होळी केली आहे. सडून मरण्यापेक्षा लढून मरू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.