धरणगाव शहरातील हनुमान नगर येथे राहणारी २० वर्षीय तरुणी कोमल रमेश माळी ही उपवासाचे फरसाण आणण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र, ती घरी परतलीच नाही. सोमवारी १ सप्टेंबर रोज दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.