मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यातील लाडझरी येथील पाझर तलाव फुटला असून प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. हा छोटा तलाव झालेल्या पावसाने फुटलेला असून त्याची पाहणी इरिगेशन डिपार्टमेंटचे उप अभियंता सावंत तसेच तलाठी भताने यांनी केलेली असून सदरील तलावाच्या पाण्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. तलावाच्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान झाले का याबाबत पाहणी करण्याचे आदेश व सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले