पोचमपाड बाभळी व बळेगाव बंदरा खालील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन करून कायमचा मावेजा वाटप करण्यात यावा, मागील वर्षी व चालू वर्षीचा पिक विमा सरसकट मंजूर करण्यात यावा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान वाटप करावे ह्या मागण्यासाठी आजपासून दुपारी 12 वाजता कारेगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.