जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. ऑलिम्पिकच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत 23 वर्षाखालील तरुण तरुणी उमेदवार आपले कौशल्य सादर करतात. आता जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाय (चीन) येथे होणार आहे.