उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 22 ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या एका रिक्षा चालकाने चार परप्रांतीय प्रवाशांना चाकूचा दाखवून 21 हजार रुपये रोख रक्कम लुटली होती. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अखेर त्या आरोपी रिक्षा चालकाला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.