सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे. या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. घुग्घुस येथे आज दि 30 आगस्टला 12 वाजता पक्ष प्रवेश आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते प्रा. हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.