राज्य सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयावरून वादंग माजले आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमचे आंदोलन होते, मात्र काढलेल्या निर्णयातून केवळ कुणब्यांना लाभ होईल, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे मराठ्यांचे काय? असा सवाल सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उपस्थित केला आहे.