त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा साधू, महंत आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रशासन नियोजन करीत असून दीर्घ कालावधी लागणारी कामे पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री.शर्मा,महानगपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आदींनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर येथे भेट दिली.