आज दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3 च्या दरम्यान मुखेड शहरातील बाऱ्हाळी नाका येथे एका ट्रकने एका काळी पिवळी सह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनेक मोटरसायकलला धडक दिली असून यात 7 ते 8 जण जखमी तर तिघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे, सदरची घटना ही ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होते आहे, सदर अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती वेळीचे पोलिसांनी धाव घेत जखमीना दवाखान्यात पाठवत वाहतूक सुरळीत केले होते.