दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून जलाशय साठा ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर जलाशय प्रचलन सुचीप्रमाणे साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:४५ च्या दरम्यान अरुणावती प्रकल्पाचे नऊ वक्रद्वार प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. पुढील काळात पाण्याचा ओघ वाढल्यास किंवा कमी झाल्यास गेटचे उघडणे आणि बंद करणे यामध्ये बदल होणार.